विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पोलीस विभाग, क्रीडा व महसूल विभागातील उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यावेळी उपस्थित होते.
नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरिक्षक अतुल सबनीस, जयेश भांडारकर, गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमप्रकाश सोनटक्के, पोलीस उपनिरिक्षक रतन उंबरकर, मोहन शाहु, श्रीनीवास मिश्रा, कृष्णकुमार तिवारी, पोलीस हवालदार रघुनाथ धुर्वे, दत्तात्रय निनावे, मृदुल नगरे, मनिष टोंगे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे तीन मानकरी या प्रमाणे आहेत. सॉफ्टबॉलमध्ये डॉ. चेतन महाडिक, ॲथलेटिक्समध्ये कु. निलिमा राऊत तर बॉक्सिंगमध्ये कु. अल्फिया तरन्न्म अक्रमखान पठाण यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख 10 हजाराचे बक्षिस देण्यात आले.
जिल्हा युवा पुरस्काराचे तीन मानकरी ठरले असून सामाजिक कार्यासाठी मोनीष अठ्ठरकर, युक्ती बेहनिया यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 10 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले तर नयन बहुउद्देशिय महिला विकास व तांत्रिक शिक्षण संस्था नागपूर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 50 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले.
महसूल विभागातील राजु लोणकर यांना आदर्श तलाठी पुरस्कारबद्दल प्रमाणपत्र व 5 हजार रोख बक्षिस देण्यात आले.
00000

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Mon May 2 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 2:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनानिमित्त कामठी तहसील कार्यालय च्या प्रांगणात 1 मे ला सकाळी 8 वाजता विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार यांनी सलामी दिली.याप्रसंगी तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसिलदार राजाराम बमनोटे, रणजित दुसावार,अमर हांडा,रघुनाथ उके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!