यवतमाळ :- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालयाच्यावतीने दि.1 मार्चला अणे महाविद्यालयात विभागस्तरीय पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रतन असोसिएट्स, युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर, अलाईड रिसोर्सेस मॅनेजमेंट सर्वीस इंडिया प्रा.लि, पीपीएस एनर्जी सोल्युशन, संसुर सृष्टी इंडिया प्रा.लि, धुत ट्रान्समिशन, विनय ॲटोमोबाईल, इंदुजा महिला मिल्क, पियाजियो व्हेईकल्स, उत्कर्ष स्मॅाल फायनान्स बॅंक, नवभारत फर्टिलायझर, शिवकृपा व कोर्ड मॅनेजमेंट, साई एंटरप्रायजेस नॅप्स एज्युकेशन फाऊंडेशन, किसन सेक्युरिटी ॲन्ड फॅसिलिटी सर्विसेस, स्वतंत्र मायक्रोफिन प्रा.लि, कल्पतरू स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी, ईक्विटास स्मॅाल फायनान्स बॅंक, नॅानस्टॅाप कार्पोरेशन आदी नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहे.
या कंपन्यांकडील रिक्त 1 हजार 244 रिक्त जागांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड करणार आहे. रिक्त जागांमध्ये सर्वेअर, मॅनेजर, सुपरवायझर, ईलेक्ट्रिशियन, रिसेप्शनिस्ट, कॅाम्प्युटर ऑपरेटर, नर्सिंग, कस्टमर केअर, ॲप्रेन्टिस, ट्रेनी कनिष्ठ अभियंता, मर्चंट, ट्रेनर, फिल्ड ऑफिसर, असिस्टंट सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झीकेटीव्ह, नेटवर्क कॅार्डिनेटर, ऑपरेटर, अकाऊंटंट, टेली कॅालर, फिल्ड फॅसिलेटर, ट्रेनी क्रेडीट ऑफिसर, सेल्स ट्रेनी, मार्केटींग एक्झीकेटीव्ह, हेल्पर, सुपरवायझर, मेसन, फिटर, कारपेंटर, ब्रॅंच मॅनेजर, असिस्टंट ब्रॅंच मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, डिजिटर मार्केटींग, वेब डेव्हलपर आदी पदांचा समावेश आहे.
या मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याकरीता https://tb.gy/eshvai या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून आपली नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांनी दि. 1 मार्च रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, व आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.