समता जेशीस् व संजीवनी सखी संघ तर्फे निःशुल्क पाणी बॉटल व रोगनिदान औषध वितरण 

– हजारो भाविकांनी घेतला लाभ

नागपूर :- समता जेशीस आणि संजीवनी सखी संघ तर्फे, पवित्र दीक्षाभूमी येथे निःशुल्क बिसलेरी पाणी बॉटल, दोन दिवस निरंतर रोग निदान व दवाई वितरण, दंत निदान, अल्पोहार वितरण करण्यात आले. या सेवाभावी कार्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला,या स्टाल चे उद्घाटन, सुप्रसिध्द हृदय रोग तज्ञ डॉ शंकर खोब्रागडे,यांनी केले अध्यक्ष स्थानी समता जेशिश् चे अध्यक्ष प्राचार्य रमेश माटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, माजी आमदार डॉ मिलिंद माने,मानव धिकार संघटनेचे प्रदीप त्रिवेदी,माजी नगरसेवक प्रा राजेश नगरकर,समता जेषीस चे सचिव आणि या शिबिराचे प्रमुख आयोजक अशोक कोल्हटकर,संजीवनी सखी संघाच्या अध्यक्ष अर्की कल्पना मेश्राम,सचिव विभा गजभिये,दंत रोग तज्ञ डॉ साकिब पटेल,डॉ दिपांकर भिवगडे,मनपा चे माजी शिक्षणाधिकारी राजेंद्र फुसेकर, रुपेश नितनवरे,डॉ अनमोल टेंभुर्ण, पामिता कोल्हटकर,आदी प्रामुख्याने उपस्थित होते हे उपक्रम गेल्या २८वर्षभरापासून पवित्र दीक्षा भूमी येथे निःशुल्क राबविण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आशा व गटप्रवर्तकांच्या बेमुद्दत संपाला प्रचंड प्रतिसाद

Fri Oct 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आशा व गतप्रवर्तकांच्या मागण्यासाठी कामठीतील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कृती समितीच्या वतीने 18 ऑक्टोबर पासून आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी बेमुद्दत संप पुकारण्यात आलेला आहे.या बेमुद्दत संपाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गटप्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे सुसूत्रीकरण करून त्यांचे सेवेत समायोजन करावे, ऑनलाईन कामाची जी सक्ती मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर करण्यात येत आहे ती तात्काळ बंद करावी, केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com