नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण आज 1 मे, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरव पत्र आणि रोख पारितोषिक दहा हजार रुपये गुणवंत क्रीडा मार्गदर्शक सॉफ्टबॉल विनोद सुरदुसे, दिलराज सिंगर खो-खो गुणवंत खेळाडू, श्रृती जोशी ,तलवारबाजी गुणवंत खेळाडू, शाश्रृती नाकाडे, पॅरा जलतरण गुणवंत खेळाडू यांना देण्यात आला.जिल्हा युवा पुरस्कार 2022- 23 चे सुद्धा वितरण महाराष्ट्र दिनी करण्यात आले. चेतन खुशालराव बेले व दीप्ती प्रशांत महल्ले यांना उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये सन्मान चिन्ह गौरव पत्र आणि रोख दहा हजार पारितोषिक देण्यात आले.त्यांच्या या कामगिरीबद्दल उपसंचालक शेखर पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि अनिल बोरवार, माया दुबळे व क्रीडा प्रेमीनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
महाराष्ट्र दिन कार्यक्रमात जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com