नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते विक्रमवीर कलाकारांना प्रमाणपत्रांचे वितरण 

नागपूर :- सिकलसेल, कॅन्‍सर, टीबी इत्‍यादी आजारांसंदर्भात जनजागृती करण्‍याच्‍या उद्देशाने महाराष्‍ट्र शासनाचा सामाजिक न्‍याय विभाग व मनीष पाटील फाउंडेशनतर्फे नुकताच ‘हुनर की तलाश’ या शीर्षकांतर्गत 180 तास मनोरंजन करण्‍याचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विश्‍वविक्रम करणा-या विक्रमविरांचा सत्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच मनीष पाटील फाउंडेशन सर्वसर्वा मनीष पाटील यांचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्‍या शुभहस्‍ते सत्‍कार व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्‍यात आला. कार्यक्रमाला डॉ.म‍िलिंद माने, सिद्धार्थ गायकवाड, नागोराव जयकर, अभिषेक शंभरकर, मोहम्‍मद जमाल, गौतम पाटील, वंदना चांदेकर यांची उपस्‍थ‍िती होती. नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सिकलसेल हा आजार उत्‍तर नागपुरात अधिक आढळतो असे सांगताना त्‍यांनी या आजाराच्‍या उच्‍चाटनासाठी कार्य करणा-या डॉ.मिलिंद माने, डॉ.श्रीखंडे व डॉ.जैन यांच्‍या कार्याचे कौतुक केले. ‘हुनर की तलाश’ हा विश्‍वविक्रमी कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्‍व्‍हेंशन सेंटर येथे 31 ऑगस्‍ट ते 7 सप्‍टेंबर दरम्‍यान घेण्‍यात आला होता. या कार्यक्रमात एकुण 450 कलाकारांनी सलग 180 तास आपली कला सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाची संकल्‍पना व आयोजन मनीष पाटील यांनी केले होते. कार्यक्रमात आयोजन समितीचे सदस्य भगवान लोणारे, अंजली डबरासे, अलका वाघमारे, सतीश अलोणे, विजया वैद्य, पल्लवी हाऊथकांनी, वैशाली तलावेकर, सुनील हिरेखान, तुषार रंगारी, संगीता तांबुसकर, किशोर गणवीर, शिल्पा लांजेवार, सुनीता इंगळे, सुनैना खाडे, प्रियंका पौनीकर, सुनीता धारगवे, अश्विनी वालके, फिरोज आलम, वामन सोमकुंवर याचा सहभाग होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com