चांदा क्लब येथे २००२ शाळकरी मुलींना सायकल वाटप

चंद्रपूर :- गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते.

ज्या समाजात महिलांचा सन्मान होतो तोच समाज खऱ्या अर्थाने संपन्न समजला जातो.माता महांकाली महोत्सवाच्या माध्यमातुन ९९९९ कन्यापुजन असो वा शाळकरी मुलींना सायकल वाटप असो, स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे.

शिक्षण पूर्ण न केल्याची वेदना फार मोठी असते याची जाणीव मला आहे त्यामुळेच अनेक गरजु विद्यार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना पुढील वर्षी सायकल देऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार महोदयांनी सांगितले.

सर्वांच्या सह्कार्यातून शहराच्या विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी ११ ठिकाणी अभ्यासिका करण्याचा संकल्प आहे त्यातील ८ अभ्यासिका सुरु झाल्या आहेत याचा आनंद आहे. ज्याला कुणाचा आधार नाही त्याच्याकडे अम्माचा टिफिन जातो. आमदार निधीचा वापर हा शहराच्या विकासासाठी होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी. आपले प्रत्येक पाऊल हे वंचितांच्या विकासाच्या दिशेने राहील असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. 

याप्रसंगी शाळकरी मुली व त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. सकाळी ८ वाजेपासुन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सायकल वाटप सोहळा पार पडला. कार्यक्रमास उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे, शहर अभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,अक्षय गडलिंग, संतोष गर्गेलवार,चांदा क्लब सचिव डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित,नागेश नित,चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी,शिक्षक उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाच्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा

Mon Oct 14 , 2024
– दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपन्न नागपूर :-68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आलेल्या लाखो अनुयायांना नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या सोयीसुविधांमुळे दिलासा मिळाला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार दीक्षाभूमी आणि परिसरात मनपाद्वारे पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा मिळाला. शनिवारी (ता.12 )दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com