Ø विभागीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक
नागपूर :- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गंत येणारी सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या .
आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक झाली.जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, नक्षलवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक डॉ.संदीप पाटील, समाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, या विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्यासह नागपूर विभागाचे सर्व जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बलात्कार व विनयभंगांच्या गंभीर गुन्हयांमध्ये पीडीतांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी पोलीस विभागाने तातडीने आरोपपत्र दाखल करावे तसेच, गेल्या काही वर्षांमध्ये न्यायालयात प्रलंबित अशा प्रकरणांचा आढावा सर्व जिल्ह्यांनी घ्यावा, अशा सूचना बिदरी यांनी केल्या. जिल्हा दक्षता समितींनी जातीय अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेण्याच्या आणि ॲट्रासिटी कायद्याची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दक्षता समितीसमोरील मे 2023ची प्रलंबित प्रकरणांचा तसेच न्यायालयात व अर्थसहायासाठी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. ‘शबरी घरकुल योजना’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’, ‘रमाई आवास योजनां’ची प्रभावी अमंलबजावणी करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी केल्या.