पथविक्रेता नोंदणीसाठी होणार शिबीराचे आयोजन!
वाडी :- वाडी नप द्वारे राज्य शासन व उच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशानुसार नुकतीच वाडी नप क्षेत्र पथविक्रेता समिती ची स्थापना करण्यात आली. निकषा नुसार या समितीत शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, व पथविक्रेता प्रतिनिधींची निवड करण्यात आली. या समितीची पहिली सभा वाडी नप कार्यालयात बुधवारी सम्पन्न झाली.
सर्वप्रथम वाडी नप चे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी उपस्थित सर्व आरोग्य विभाग,पोलीस ,नप अधिकारी व अन्य समिती सदस्यांचे स्वागत करून या समितीची स्थापना उद्देश व कार्यप्रणाली ची माहिती दिली. त्या नुसार वाडी नप क्षेत्रात स्थायी व अस्थायी स्वरूपात विविध प्रकारचे पथविक्रेते यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांचे नियोजन व नोंदणी नसल्याने अनेक समस्यांना नप व नागरिकांना सामोरे जावे लागते. नप ला ही पुढे विक्रेता झोन चे नियोजन करायांचे आहे.त्या मुळे नोंदणी आवश्यक बनली आहे.पथ विक्रेत्यांच्या नोंदी साठी एका खाजगी संस्थे कडे हे कार्य सोपविले आहे.नोंदणी केलेल्याना पुढे नप तर्फे ओळखपत्र प्रदान करण्यात येईल व त्या शिवाय मग पथविक्रेत्याना व्यवसाय करता येणार नाही. नोंदणी नंतर समिती समोर सर्व प्रस्ताव मंजुरी साठी ठेवण्यात येईल.खोटे व दिशाभूल करणाऱ्या पथविक्रेता चे अर्ज रद्द केल्या जाऊ शकतील,पोलीस कार्यवाही देखील केल्या जाऊ शकेल.व या आधारावर या पथविक्रेता ना शासकीय कर्ज योजनेचा लाभ देण्यात येईल.मात्र आता पर्यंत फक्त 400 पथविक्रेत्यांनीच नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले.ही संख्या 1500 च्या वर असणे अपेक्षित आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी सभेला उपस्थित अधिकारी व सदस्य यांना नोंदणी वाढ व अन्य विधायक सूचना प्रस्तुत करण्याची विनंती केली. त्या नुसार पथविक्रेता प्रतिनिधी अजय देशमुख यांनी त्यांच्या कडे 400 पथविक्रेता ची नोंदी तर नानाभाऊ चव्हाण यांनी त्यांच्या कडे 100 पथविक्रेता ची माहिती संकलित असल्याचे सांगितले.त्यावर मुख्याधिकारी यांनी उपस्थित नोंदणी कम्पनी प्रतिनिधीला त्यांचे सहकार्य घेण्याच्या सुचना केल्या.समिती चे सदस्य प्रा.सुभाष खाकसे यांनी असे वेगळे वेगळे फिरून सर्वेक्षण व नोंदणी ऐवजी व्यापक प्रसिद्धी व नियोजन करून नोंदणी शिबीर आयोजित केले तर योग्य प्रतिसाद व उद्देश पूर्ती होण्याचे मत व्यक्त केले.सूचना योग्य व महत्वाची असल्याने मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी उपस्थित कंत्राटदार प्रतिनिधी यांना असे एक नोंदणी शिबीर लावण्याचे निर्देश दिले.व त्या साठी सर्व स्तरावर सर्व प्रकारे प्रचार व प्रसार करण्याच्या सूचना ही दिल्या. त्या अनुषंगाने येत्या 27 ऑक्टोम्बर ला दत्तवाडी परीसरात एक पथविक्रेता नोंदणी साठी शिबीर आयोजनाचे निश्चित करण्यात आले.पथविक्रेत्यांनी आपले आधार कार्ड,राशन कार्ड व दुकानाचा ते दिसत असलेला फोटो घेऊन नोंदणी साठी उपस्थित राहण्याचे आवहान करण्यात आले.समिती सदस्य आशिष नंदागवळी यांनी असेच एक शिबीर वाडी भाजी मार्केट परिसरात लावल्यास या भागातील पथविक्रेत्याना साजेसे होईल अशी सूचना केली असता ती मान्य करून 28 ऑक्टोम्बर ला असे शिबीर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.वाडी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय धुमाळ यांनी ही आवश्यक विचार प्रगट केले. शेवटी मुख्याधिकारी यांनी उपस्थित सर्व नवनियुक्त अधिकारी व सदस्यांचा परिचय करून,सहकार्य करण्याची अपेक्षा केली. या बैठकीला बँकेचे प्रतिनिधी गैरहजर असल्याची बाब प्रा.सुभाष खाकसे यांनी चर्चेत निदर्शनास आणून दिली असता पुढील सभेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याचे निश्चित करावे अशा त्यांनी सूचना दिल्या.बैठकीचे आभार उपमुख्याधिकारी रत्नमाला फटींग यांनी केले.पथ विक्रेत्याना नप मध्ये अधिक माहितीसाठी सम्पर्क साधावा. या बैठकीला समिती सदस्य नरेशकुमार चव्हाण,कांचन माने, डॉ.प्राजक्ता उराडे,वैद्य, परसराम भोयर, रोशन बागडे, सूरज पेशवे, विनोद कोंढावे, दीपक शेंडे, प्रेमसिंग पुरखे, माताप्रसाद साहू, नप चे प्रतिनिधी विद्युत अभियंता नंदन गेडाम, समुदाय संघटक रणजित सांगोळे, भारत ढोके,व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते