मुख्यमंत्रीपदासाठी नावाची चर्चा,मुरलीधर मोहळ म्हणाले, पार्टीचा निर्णय आमच्यासाठी… ट्विट काय?

मुंबई :- राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला आहे. प्रचंड बहुमत मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली असून सर्वात जास्त जागा जिंकत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. मात्र निवडणुकीच्या निकालाला आठवडा झाला तरी राज्याला अद्याप काही नवा मुख्यमंत्री मिळालेला नसून त्यावर अद्याप खलबत सुरू आहेत. गुरूवारी महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेत चर्चा केली. भाजपला या निवडणुकीत 132 जागा मिळाल्याने भाजपचाच मुख्यमंत्री राज्यात असेल हे स्पष्ट झालं आणि या यशाचे शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आपसूकच पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यावर गेल्या आठवड्याभरपासून अनेक खलबत सुरू आहेत. पुढील आठवड्यात शपथविधी होऊन राज्याला नवा मुख्यमंत्री मिळण्याचे संकेत आहेत. मात्र असं असतानाच आता अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची बरीच चर्चा होत आहे.

मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या बातम्या साफ फेटाळून लावल्या आहेत. X या सोशल मीडिया वर साईटवर ट्विट करत त्यांनी या बातम्यांचे खंडन केलं आहे. समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित असल्याचे त्यांनी नमूद केलंय.

मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार असून लोकसभी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी पुण्यात प्रचार सभा घेतली होती. ही निवडणूक जिंकत पुण्याचे खासदार म्हणून मोहोळ हे लोकसभेत पोहोचले. एवढंच नव्हे तर त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं. त्यांच्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. ते केंद्रात कार्यरत असतानाच आता अचानक राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक नेटकऱ्यांनीही त्याबाबत कमेंट्स केल्या.

काय म्हटलं मुरलीधर मोहोळ यांनी ?

समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे, असे मोहोळ म्हणाले.

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, दहा वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Sat Nov 30 , 2024
मुंबई :- राज्यात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात येत आहे. मुंबईसह उपनगरातही थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. मुंबईत आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. मुंबईतील हे तापमान गेल्या दहा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान आहे. सध्या या गुलाबी थंडीचा मुंबईकर आनंद घेत आहेत. मुंबईसह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com