प्रशासनातर्फे खिंडसी तलाव येथे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

– तहसिलदार रमेश कोळपे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन

– शोध व बचाव बाबत कार्यशाळेत प्रशिक्षण 

रामटेक :- रामटेक तालुक्यामध्ये पावसाळयात अतिवृष्टी व नैर्सार्गक आपत्तीमुळे होणारे नुकसान व हानी टाळण्यासाठी ग्राम स्तरावर तसेच तालुका स्तरावर सर्व साहित्यासह शोध व बचाव पथक सक्रिय असणे आवश्यक आहे. शोध व बचाव प्रशिक्षण नुकतेच तहसिलदार रमेश कोळपे यांचे प्रमुख उपस्थितीत खिंडशी तलाव रामटेक येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदरहु प्रशिक्षणात तहसिलदार रमेश कोळपे,अप्पर तहसिलदार शेखर पुनसे, पोलिस निरीक्षक प्रशांत काळे, नायव तहसिलदार भोजराज बडवाईक, तसेच रामटेक तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व कोतवाल, आपदा मित्र व इतर कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

मान्सून काही दिवसात दाखल होणार आहे या पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरानंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची कशी सुटका करावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हे विशेष.

सदर प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिम (बचाव पथक) बी. जी. दाते व त्यांची चम्मु आलेले होते. सर्वप्रथम त्यांनी आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणारे साहित्य उदा. OBM रबर बोट, ईन्फाटेबल लाईट, लाईफ जॅकेट, लाईफ बाय यायावत सविस्तर माहिती व उपयोगाची पध्दत समजवून सांगितले.

त्याचप्रमाणे गांव पातळीवर काही घरघुती वस्तूंचा वापर करुन पाण्यामधुन आपण स्वतःला अथवा इतरांना कसे बचाव करावे याबाबत प्रशिक्षणात सांगण्यात आले. उदा. प्लास्टीक बॉटल पासुन तसेच प्लॉस्टीक कॅन, प्लॉस्टीक गुंडा पासुन लाईफ बाय रिंगच्या उपयोगाप्रमाणे कसा करता येईल हे शिकवीले, प्रशिक्षणात मोटार बोट व टेन्टचा उपयोग कसा करायचा याबवत प्रत्यक्ष प्रशिक्षण करण्यात आले. त्यात सर्वानी उत्साहाने सहभाग नोंदविले उपस्थितांनी यांचा आम्हाला आपत्ती काळात फायदा होईल असे उदगार काढले व प्रशिक्षण उत्तमरित्या पार पाडण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘पौर्णिमा दिवस’ निमित्त रामदासपेठ परिसरात जनजागृती

Sat May 25 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत बुधवारी (ता.२२) रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंग चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. या अभियानाला रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंग चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com