संपूर्ण विदर्भात मिशन आयएएस राबविणार संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

मिशन IAS फाउंडेशनची 22 वर्षांपूर्वी स्थापना झाली असून..

स्पर्धा परीक्षा IAS मिशन जनजागृती मोहीम संपूर्ण विदर्भात राबविणार.

नागपूर :- 22 वर्षापूर्वीची स्थापना मिशन आयएएस आज संपूर्ण भारतामध्ये काम करीत आहे.या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते 12 मे 2000 रोजी अमरावतीच्या दंत महाविद्यालयात झाले प्रमुख पाहुणे म्हणून अभिनय कुंभार आय आर एस अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त धनराज खामतकर व प्रा.अमोल पाटील हे होते. अमरावती शहरात स्पर्धा परीक्षेसाठी सुरू झालेला व विनामूल्य सेवा देणारा हा पहिला उपक्रम. त्यापूर्वी अमरावती शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एकही ग्रंथालय किंवा अभ्यासिका उपलब्ध नव्हती. परंतु विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य बाबुराव उर्फ अण्णासाहेब हिवसे यांनी पुढाकार घेतला व या उपक्रमाची मुहूर्तमेढ अमरावती शहरात 12 मे 2000 रोजी करण्यात आली.

या 21 वर्षात मिशन आयएएसने संपूर्ण भारतात आपल्या प्रबोधनाचे जाळे विणले आहे. 200 आयएएस व राजपत्रित अधिकारी या एक 21 वर्षात मिशन आयएएसमध्ये जवळपास 200 आयएएस व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत. मिशन आयएएसने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत संस्कार शिबिरात या अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य सचिव जे.पी.डांगे यांनी एकूण तेरा कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर दुसरे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी देखील आमच्या उपक्रमात भाग घेतला आहे एवढ्या मोठ्या संख्येने आय ए एस. सनदी अधिकारी सहभागी झालेली मिशन आयएस ही भारतातील एकमेव संस्था आहे.

-फक्त एक रुपयात आयएएस मिशन आयएएसतर्फे फक्त एक रुपयामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला 365 रुपये भरायचे. त्यामध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य देण्यात येतात. त्यांची परीक्षा घेण्यात येते त्यांचे पेपर तपासण्यात येतात आणि त्यांना गुणपत्रिका व प्रमाणपत्र देखील देण्यात येते. फक्त एक रुपयामध्ये आयएएसची प्रशिक्षण देणारी मिशन आयएएस सारखी दुसरी संस्था आज तरी अस्तित्वात नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून देण्यात येते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी मानसिकता तयार करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. संपूर्ण भारतात 15000 कार्यशाळा 12 मे 2000 रोजी अमरावतीला स्थापन झालेल्या मिशन आयएएसने आतापर्यंत संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात 15000 विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या कार्यशाळे साठी मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे व त्यांचे सहकारी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. त्यांच्या या कार्यशाळेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी रमेश घोलप आयएएस व विशाल नरवाडे यांचा समावेश आहे. या उपक्रमाला संपूर्ण भारतात उत्तम प्रतिसाद असून अशाप्रकारे पूर्ण भारतात स्पर्धा परीक्षा घेऊन मिशन आयएएसने व्यापक जनजागृती केली आहे.लाँकडाऊनचा सदुपयोग गतवर्षी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे विविध राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी मिशन आयएएसने 5 जून पासून २०२० पासून जय जवान जय किसान ही स्पर्धा परीक्षेला वाहिलेली व्याख्यानमाला सुरू केली. गेल्या ११ महिन्यापासून ही व्याख्यानमाला सुरू असून याव्याख्यान मालेमध्ये अनेक आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी व्याख्याते म्हणून आलेले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांचा सुसंवाद व्हावा यासाठी मिशन आयएएसने वेळोवेळी झूम मिटींगचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळे सनदी व राजपत्रित अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद असून लोकांनी लाँकडाऊनच्या काळात या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. आयएएस विद्यार्थ्यांचा सत्कार मिशन आयएएसने गेल्या 21 वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या IAS या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर IAS झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी अमरावतीला आयोजित केला आहे. या सत्कारांमध्ये बरेचसे आईएएस टॉपर अमरावती शहरात येऊन गेले आहेत. त्यामध्ये भारतातून पहिली आलेली शेना अग्रवाल पंजाब अमृतेश औरंगाबादकर पुणे. राहुल रेखावार नांदेड, शिप्रा आग्रे लातूर, डाँ.विपीन इटणकर चंदिगड डॉ.अश्विनी जोशी रत्नागिरी, संपदा मेहता पुणे, विशाल नरवाडे बुलढाणा यांचा समावेश आहे. यावर्षी देखील लाँकडाऊन असताना झूम मीटिंग द्वारे झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, यशदाचे डॉ.बबन जोगदंड व माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे हे उपस्थित होते. पुस्तकांचे प्रकाशन मिशन आयएएसने या 21 वर्षात स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये मी आयएएस अधिकारी होणारच. शेतकऱ्याची मुले झाली कलेक्टर. स्पर्धा परीक्षेची एबीसीडी. प्रेरणा स्पर्धा परीक्षेची. आनंदी राहा यशस्वी व्हा. विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा यासारख्या पुस्तकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लाकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ही पुस्तके ई-बुक स्वरूपात विनामूल्य वितरित करण्यात आली आहेत. मिशन आयएएसची ही वाटचाल गेल्या 21 वर्षांपासून निरंतरपणे सुरू असून स्पर्धा परीक्षेसाठी 24 तास विनामूल्य सेवा देणारी ही भारतातील एकमेव आकादमी आहे. 23 ते 100 अधिकारी मिशन आयएएसने 12 मे 2000 रोजी जेव्हा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तेवीस विद्यार्थी हे IAS परीक्षा पास होत होते. मिशन आयएएसने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच जिथे जमेल तिथे विनामूल्य स्पर्धा परीक्षा घेऊन जे वातावरण तयार केले तसेच महाराष्ट्रातील इतरही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे या 21 वर्षानंतर या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या IAS या परीक्षेच्या निकालात अभूतपूर्व बदल झाला असून हा आकडा 23 वरून 21 वर्षात 100 च्या वर गेलेला आहे. सातत्याने एखाद्या उपक्रमाचा प्रामाणिकपणे पाठपुरावा केला तर समाजामध्ये कोणता बदल होऊ शकतो हे मिशनने सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत का पहला एल्यूमिनियम फ्रेट रेक आया पटरी पर

Wed Nov 30 , 2022
नई दिल्ली/नागपुर :-  देश में पहली बार मालगाड़ी के डिब्बे एल्युमिनियम के बनाए गए हैं। आरडीएसओ, बीएससीओ और हिंडाल्को की मदद से ये रैक तैयार हुए हैं। केन्द्रीय रेल, संचार तथा इलेक्ट्रॉनिक्स एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्री अश्विनी वैष्णव ने आज भुवनेश्वर रेलवे स्टेशन पर भारत के पहले एल्यूमिनियम फ्रेट रेक – 61 बीओबीआरएनएएलएचएसएम1 (Aluminum Freight Rake – 61 BOBRNALHSM1) का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com