मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात ‘महारेरा‘चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर सोमवार दि. २० आणि मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार तेजस वाघमारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराच्या स्थापनेमागचा उद्देश, रचना आणि कार्यपद्धती, आतापर्यंत महारेरा अंतर्गत नोंदणी झालेले प्रकल्प, महारेरात नोंदणी करण्याची पद्धत, ग्राहकांच्या हिताचे घेतलेले निर्णय आदी विषयांची माहिती डॉ. प्रभू यांनी ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.