तारा माता मंदिरात अखंड मनोकामना ज्योत विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- तालुक्यातील न्यू येरखेडा येथील तारा माता मंदिरात अखंड मनोकामना ज्योत विसर्जन व महाप्रसादाचे वितरण करून चैत्र नवरात्र परवाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आले ,शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला चैत्र नवरात्र च्या पर्वावर तारा माता मंदिरात अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती पंडित कमलेश महाराज सहारे यांचे हस्ते पूजा आरती ,करून अखंड मनोकामना ज्योतिचे विसर्जन करून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

शेकडोभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष टिकाराम भोगे, माजी सरपंच मंगला कारेर्मोरे, मनीष कारेमोरे ,जगदीश झाडे ,मधुकरराव ढोले ,गौरीशंकर ढिमोले ,वसंतराव फायदे ,दास बाबू, एस बावणे, मुरली पारधी, मनोहर पारधी, प्रणय राखडे ,सुषमा राखडे ,भाऊराव देशमुख ,वसंतराव गुजेवार,रजनी कारेमोरे, शोभा रेवतकर, राकेश श्रीवास्तव सह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com