नागपूर :- नागपुरातील महापुरुषांच्या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी नागपूर महानगर पालिकेची आहे. 28 नोव्हेंबरला सामाजिक व शैक्षणिक क्रांती चे जनक महात्मा फुले यांचा 132 वा स्मृतिदिन आहे. आज फुले मार्केट परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यावर महात्मा फुलेंना मनपाने अडगळीत तर टाकले नाही ना? असे जाणवले.
महात्मा फुलेंच्या स्मृती दिनाला फक्त दोन दिवस आहेत. साफसफाई, रखरखाव, मेट्रोरेल चे काम, पुतळ्याची डेंटिंग-पेंटिंग बाकी आहे. टाईल्स उखडल्या आहेत. नागपूर महानगर पालिकेने त्वरित लक्ष देऊन दोन दिवसात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला व परिसराला चकचकीत करावे. म्युरल, मार्बलवर कोटेशन वगैरे लावावे, किंवा बहुजन महापुरुषांशी आमचे देणे घेणे नाही असे सांगून तरी टाकावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
यावेळी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी कॉटन मार्केट मधील महात्मा फुलेंचा अडगळीतील पुतळ्याचा फोटो व महालातील बहुजनेतर कामगार नेते रुईकर यांच्या चकचकीत पुतळ्याचा आजच काढलेला फोटो याप्रसंगी शेअर केलाय.