मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. बुधवार 15 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक कविता आत्राम यांनी घेतली आहे.
धुळे जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध केलेली कार्यवाही आदिविषयी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.