राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा नागपूर दौरा

नागपूर :– राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम दि. 7 ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नागपूर दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे.

दि. 7 ऑक्टोबर रोजी रविभवन येथे आगमन. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हयांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त नागपूर, प्रादेशिक उपआयुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांचे सोबत रविभवन येथे आढावा व चर्चा. दुपारी १ ते २ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे सोबत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा व चर्चा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांचेसोबत महानगरपालिकेतील अनुसूचित जाती जमाती यांच्या समस्यांबाबत चर्चा. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ ते ४ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नागपूर यांच्या अधिनस्त असलेल्या विविध योजनेबाबत आढावा.

दुपारी ४ ते ५ नागपूर येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाच्या अडचणीबाबत गृहपाल यांचे सोबत चर्चा व वसतिगृहास भेट. सायंकाळी ५ ते ६ अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनेसोबत चर्चा व रात्री मुक्काम.

8 ऑक्टोबर रोजी रविभवन येथून सकाळी १० वाजता शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रस्थान.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते‘मोबाईल मेडिकल युनिट’चे लोकार्पण

Mon Oct 7 , 2024
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या (रविवार) मोबाईल मेडिकल युनिट रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स येथे हा कार्यक्रम झाला. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था व बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रुग्णवाहिकेचे संचालन होणार आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातही आता आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रुग्णवाहिका उपलब्ध करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com