सावनेर :- पोस्टे केळवद अंतर्गत खानगाव सावनेर येथे राहणारा आरोपी सेवकराम लच्छीराम कदरे, वय 56 वर्ष रा. वार्ड क्र. ३ खानगांव ता. सावनेर याचे घराची दारूवाबत भरझडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून प्रत्येकी १८० मिली देशी दारूने भरलेल्या ०५ प्लॉस्टिक सिलबंद बॉटल किमंती ३५०/-रु. चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
दि. ११/०७/२०२४ रोजी पोस्टे नरखेड अंतर्गत मौजा गोंडेगाव येथे राहणारा आरोपी देवानंद सुधाकर कवडती वय २१ वर्षे रा. गोंडेगाव याचे घराची दारूबाबत घरझडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून १७ लिटर मोहाफुल गावठी दारू प्रति लिटर ५० रू प्रमाणे एकुण कि. ८५० रू चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
पोस्टे बोरी येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखविख्दारे माहीती मिळाली की एक इसम हा सातगाव ज्ञानदिप शाळे जवळ येथे आपल्या भरून अवैदयरित्या मोहाफूल गावठी दारूची विक्री करीत आहे अशा मिळालेल्या खवरेवरून सातगाव ज्ञानदिप शाळे जवळ आरोपी गोविंदा चंद्रभान पारसे वय 26 वर्ष रा. ज्ञानदिप शाळेजवळ मु. किन्हाळा सातगाव ता. हिंगणा जि. नागपूर याचे परी रेड केली असता आरोपीचे परात स्वयंपाक खोलित गॅस ओटयाखाली एका पांढ-या रंगाच्या प्लास्टीक डपकी मध्ये मोहाफूल दारू मिळून आल्याने आरोपीचे ताब्यातून 20 लिटर मोहफुल गावठी दारू प्रति लिटर 50 रु प्रमाणे रु एकुण 1000/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
दि. ११/०७/२०२४ रोजी पोस्टे वेलतूर अंतर्गत पचखेडी ता कुही येथे राहणारा आरोपी नामदेव शित्रु मेश्राम वय 64 वर्ष रा. पचखेडी ता कुही याचे घराची दारूबाबत घरझडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून 180 MI क्षमतेच्या 18 देशी दारूच्या निपा प्रतेकी 70/- रू प्रमाणे एकुण 1260/- रूपये चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.