नागपूर :- कंत्राटदार विरहित रोजगार देणार हरियाणा सरकार प्रमाणे महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार देण्यासाठी हरियाणा कौशल्य विकास बोर्डा प्रमाणे नवीन यंत्रणा उभारणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय मजदूर संघाच्या बैठकीत सांगितले.
सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न विविध संघटना प्रमुख यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली होती. या मिटिंग मध्ये राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, उपुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकर परदेशी, प्रधान सचिव (कामगार) विनिता वेद सिंघल, प्रधान सचिव (ऊर्जा)मा.आभा शुक्ला, तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक (मा.सं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते.
या वेळी भारतीय मजदूर संघाचे वतीने प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येनुरे, प्रदेश सचिव मा.ऍड.विशाल मोहिते, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे व रोहित कोळवणकर उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांना पारेषण व वितरण भरती मध्ये आरक्षण व वयात सवलत मिळावी, आय टी आय नसलेले कुशल व अनुभवी कमी केलेल्या कामगारांना परत कामावर घ्यावे, कोर्ट केस चे कामगार कामावर घेण्याच्या सूचना फडणवीस साहेबांनी प्रधान सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांना दिल्या. तसेच पगार वाढीचे पत्रक त्यांना दिले असता पगारवाढ दिली जाईल असेही ऊर्जामंत्री यांनी माण्य केले.
अपघातात मृत्यु मुखी पडलेल्या कमगारांना आर्थिक मदत दिली जाईल,मेडिक्लेम योजना दिली जाईल व त्यांचे वेतन थेट बँकेत जाण्यासाठी प्रभावी यंत्रणा तातडीने राबवण्याच्या सूचना कामगार सचिव विनिता वेद सिंघल त्यांनी दिल्या.
राज्यातील कंत्राटदारांच्या कडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली असता प्रधान सचिव ऊर्जा यांनी वीज कंत्राटी कामगार संघाच्या सर्व समस्यां साठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून मिटिंग घेण्याची सूचना देऊन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या.
वीज उद्योगातील कंत्राटी कामगार उपाशी आहेत व त्यांच्या कष्टाच्या घामाच्या पैश्यावर संगनमताने काही कंत्राटदार व अधिकारी मजा मारत आहेत या साठी कंत्राटदार विरहित व वयाच्या 60 वर्षा पर्यंत रोजगार मिळाला पाहिजे. उर्जामंत्री यांनी या साठी एक स्वतंत्र मिटिंग कंत्राटी कामगार संघा सोबत घ्यावी. तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून आगामी लढा देणार असल्याचे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले
सचिन मेंगाळे यांनी ही मिटिंग घेतल्या बद्दल ऊर्जामंत्री यांचे आभार मानले.