नागपूर :- पेटंट फेस्टिवलची कल्पना एकदम अनोखी आहे. विद्यार्थ्यांना सकारात्मक उर्जा देणारी आहे. वेगळा विचार करायला लावणारी आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसह कल्पनांच्या महाकुंभात सहभागी होऊ असा निर्धार शहरातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आणि अधिष्ठातांनी व्यक्त केला.
व्हिजन नेक्स्ट या सामाजिक संस्थेच्यावतीने शहरात पहिल्यांदाच सर्जनशील कल्पनांची स्पर्धा होणार आहे. पेटंट फेस्टिवल होणार आहे. यात सगळ्याच वयाच्या कल्पक व्यक्ती आपल्या कल्पनांची नोंद करू शकतात. भन्नाट कल्पनांना लाखोंची बक्षीसे दिली जाणार आहेत.
यासंदर्भात शहराच्या प्रतिष्ठित महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची एक बैठक हॉटेल अशोक येथे पार पडली. या वेळी शंभराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ही स्पर्धा काय आहे? कशी आहे? कुठे होणार आहे? त्यात कोण सहभागी होऊ शकतो? या सगळ्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. व्हिजन नेक्स्टचे डॉ. योगिता कस्तुरे आणि मनोज चव्हाण व इनलायटन दी सोलचे विनय चावला यांनी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शहरात विविध स्वरुपाच्या स्पर्धा होतात, हे एकदम वेगळी आणि अनोखी आहे. यातून तरुणांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. वेगळ्या दिशेने विचार करण्याची क्षमता विकसित होईल. असा विश्वास शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला.
इथे करा नोंदणी..
ज्यांच्याकडे सर्जनशील कल्पना आहेत. ज्यामुळे देशाचे, शहराचे कल्याण होऊ शकते असे आपणास वाटते. अशी कल्पना www.patentfest. Com इथे नोंदवा. ५ ऑगस्ट की अखेरची तारीख आहे. चांगल्या कल्पना नोंदविणाऱ्यांना ८ आणि १० ऑगस्ट रोजी सादरीकरणाची संधी दिली जाईल. अंतीम स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्या कॉलेजमधून सर्वाधिक कल्पना येतील अशा पाच कॉलेजेसला बक्षीसे दिली जाणार आहेत.