संघटनेच्या माध्यमातून पंचपरिवर्तनाचा निर्धार – संघाचे ज्येष्ठ प्रचारक मुकूल कानिटकर यांचे प्रतिपादन

खामगाव :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समाजातील नव्हे तर, सर्व हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे, असे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी म्हंटले होते. त्याच उद्देशाने आज संघकार्य सुरू आहे. संघटनेच्या माध्यमातून पंचपरिवर्तनाचा संकल्प संघाने केला आहे. त्याअंतर्गत पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था आणि नागरिक कर्तव्याबाबत जनजागरणाचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारक टोळीचे सदस्य मुकुल कानिटकर यांनी केले. ते खामगाव येथील नगराच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

नगर परिषद शाळा क्र. ६ च्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सराफा जिल्हाध्यक्ष मनोज शाह यांच्यासह जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, तालुका संघचालक संतोष देशमुख उपस्थित होते.

भारत हे हिंदू राष्ट्र आहे. प्रत्येक भारतीय हिंदू आहे. हिंदुत्वाची ओळख कायम राहावी आणि ते जनमनात रुजावे म्हणून संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भाषा, भूषा, भजन, भोजन आणि भ्रमणाबाबत समससतेचा आग्रह धरला जात आहे, असेही मुकुल कानिटकर म्हणाले.

समाजाला स्वावलंबी करण्यासाठी संघाच्या माध्यमातून आज देशभरात १ लाख ६३ हजार सेवा प्रकल्प सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. शेतीच्या उत्पादन वाढीसाठी गोरक्षण आवश्यक आहे. आज सर्वत्र जैविक शेतीची चर्चा आहे. रासानिक शेतीला पर्यांय म्हणून जैविक शेती केली जात आहे. त्यासाठी ही गोरक्षणाची गरज आहे. पर्यावरण रक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी कुटुंबातून संस्कार होण्याची गरजही मुकुल कानिटकर यांनी प्रतिपादित केली.

नैसर्गिक आपत्तीत स्वयंसेवक अग्रेसर

देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात पूर, भूकंप इत्यादींसारखी नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास संघाचे स्वयंसेवक सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहचून आपत्तीग्रस्तांना मदत करतात, ही संघाची विशेषता आहे, असे प्रमुख पाहुणे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मनोज शाह यांनी सांगितले.

प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय, आभार प्रदर्शन नगर संघचालक प्रल्हाद निमकंडे यांनी केले. तत्पूर्वी, दुपारी ४.३० वाजता नगरातून स्वयंसेवकांचे पथसंचलन निघाले. शाळा क्र. ६ च्या प्रांगणातून पथसंचलनाला सुरुवात झाली. एकबोटे चौक, अग्रसेन चौक, जगदंबा चौक, अर्जून जल मंदिर, सरकीलाईन, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मस्तान चौक, फरशी, लाकडी गणपती, भगतसिंग चौक मार्गे पथसंचलन प्रारंभस्थानी पोहोचले. विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor holds review of schemes and projects of Mumbai Suburban Districts; meets representatives of various political parties

Tue Oct 15 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor C.P. Radhakrishnan had separate meetings with the people’s representatives, representatives of various political parties, industries, tribal communities, minorities, Divyang sportspersons, artists and social workers from the Mumbai Suburban District at Raj Bhavan Mumbai on Mon (14 Oct). The meeting was organised to review the progress of developmental works and to understand the concerns and aspirations of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com