संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रामपंचायत चे उपसरपंच यांनी शासकीय जमीनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी खैरी ग्रा प चे उपसरपंच रामदयाल ठाकरे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानव्ये अपात्र घोषित करण्याचे आदेश 17 ऑक्टोबर ला पारित केले तर या आदेशविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे मत अपात्र उपसरपंच रामदयाल ठाकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधिकडे व्यक्त केले.