फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील धर्मांतराच्या घटनेबाबत सखोल चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य हरीभाऊ बागडे यांनी मांडली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ बाबत विविध राज्यांकडून केलेले कायदे मागविण्यात आले आहेत. त्याचा अभ्यास सुरू असून याबाबतचा कायदा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनच्या विचाराधीन आहे.

मुलींना फूस लावून पळवून, धर्मांतरण करून लग्न करण्याच्या प्रकरणांमध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एसओपी तयार करून सर्व पोलिस ठाणे यांना कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सदस्य सर्वश्री राम सातपुते, हरिष पिंपळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ठाणे – नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना - मंत्री उदय सामंत

Thu Aug 3 , 2023
मुंबई :- जुना कळवा येथील छत्रपती शिवाजी चौक येथील पूलाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न येत नाही. ठाणे ते नाशिक रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाईप लाईन रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com