उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राम आश्रमला भेट व महात्मा गांधींना अभिवादन

वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमला भेट दिली व गांधीजींना अभिवादन केले.यावेळी खासदार रामदास तडस, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.पंकज भोयर, आ.दादाराव केचे, माजी आमदार आशिष देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरुल हसन उपस्थित होते. उपस्थितांनीही महात्मा गांधीच्या स्मृतींना अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमातील प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत अभिप्राय देखील नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साहित्य, भजनातून समाजाला दिशा दिली - देवेंद्र फडणवीस

Tue Oct 3 , 2023
Ø राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन Ø संमेलनातून राष्ट्रसंतांचे साहित्य, भजने लोकांपर्यंत पोहचेल Ø आजनसरातील 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार वर्धा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा काळ पारतंत्र्य, रुढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धेचा काळ होता. समाजात असमानता तर तरुणाई भरकटलेल्या अवस्थेत होती. अशा स्थितीत राष्ट्रसंतांनी तरुणांना भजनाद्वारे प्रबोधनातून मोहीत केले. संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com