बाळू धानोरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई :- “खासदार बाळू धानोरकरांच्या निधनाने महाराष्ट्राने एक तरूण राजकारणी गमावला आहे. त्यांच्या निधनाने लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या कार्याने एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. एक तरूण राजकारणी दिल्लीच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करीत असतानाच त्यांचे अकाली निधन दुःखदायक आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना प्राप्त होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Raksha Mantri Rajnath Singh interacts with Indian diaspora in Nigeria during his visit to Abuja

Tue May 30 , 2023
Emphasises on Government’s focus on ‘Make in India, Make for the World’; Lauds the Armed Forces for protecting the nation from adversaries New Delhi :- Raksha Mantri Rajnath Singh interacted with the Indian diaspora in Nigeria, at an event organised by the Indian High Commission in Abuja on May 29, 2023. The event was attended by the Indian community not […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com