मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
पुणे – नाशिक या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांची पुणे व नाशिक शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे. तसेच यामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अश्वमेघ यज्ञ निमित्त मुंबई येथे आलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचीही सदिच्छा भेट घेतली.