अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर, बुलढाणा येथे ७७५ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसन झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची जागतिक महिला दिनी घोषणा

Wed Mar 8 , 2023
मुंबई : “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार राज्य शासन मोफत करणार असल्याची घोषणा आज जागतिक महिला दिनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर) फी माफ करणार असल्याचेही, महाजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!