नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली चे तपास पथक हे गुन्हेगार तपासणी करीता पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहीती मिळाली की, राहुल नगर झोपडपट्टी, नवजीवन कॉलोनी येथे राहणारा गोटया नावाचा हदपार ईसम हा घरी आलेला आहे. अशा मिळालेल्या माहीतीवरून नमुद ठिकाणी जावुन चेक केले असता हद्दपार ईसम नामे प्रफुल उर्फ गोटया फुलचंद पाटील वय २४ वर्ष हा राहते घरी मिळुन आला. आरोपीस पोलीस ठाणे येथे आणुन अभिलेख तपासला असता, त्यास पोलीस उप आयुक्त परीमंडळ क. ०२ यांचे हद्दपार आदेश क. १४/२०२४ दिनांक २६.०८.२०२४ अन्वये नागपुर शहर व ग्रामीण हद्दीतुन ०१ वर्षा करीता हद्दपार केल्याचे दिसुन आले, आरोपी हा हद्दपार असतांना कोणतीही परवानगी न घेता हद्दीत समक्ष मिळुन आला. आरोपीने हे कृत्य कलम १४२ म.पो.का अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द पोलीस ठाणे धंतोली येथे गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हद्दपार ईसमास अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com