नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ ने अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत आरोपी तपासणी मोहीम राबवित असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३ येथे राहणारा हरपार आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेशराव शिदि, वय ३० वर्षे हा घराजवळील कोपऱ्यावर दिसुन आल्याने त्यास घेराव टाकुन ताब्यात घेतले. आरोपी यास मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ४ यांचे आदेश क. ०१/२०२४ दिनांक ०३.०४.२०२४ पासून ०१ वर्षाकरीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतून हद्दपार केले असतांना, तो विना परवाना हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शहर हद्दीत फिरताना मिळुन आला. आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी फिर्यादी पोहवा. नाझीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नंदनवन येथे पोउपनि, दळवी यांनी आरोपीविरूध्द कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे.