अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील देवरी पंचायत समिती अंतर्गत कडीकसा व गणुटोला येथील कार्यरत ग्रामसेवक बंडू कैलुके यास 10 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.
तक्रारदाराचा ठेकेदारीचा व्यवसाय असून त्यांचा मामा हा बांधकाम ठेकेदार आहे. जिल्हा परिषद गामीण पाणी पुरवठा योजना गट ग्राम पंचायत कडीकसा अंतर्गत कडीकसा व गणुटोला येथे नळ व पाईप लाईन काम सुरू आहे त्यांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक बंडू कैलुके याने 18 हजार रूपयांची मागणी केली होती.तकारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांने लाँच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानंतर सापळा रचून 10 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक कैलुके यास रंगेहाथ पकडण्यात आले.महाराष्ट लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये देवरी पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुलीस उप अधीक्षक पुरूषोत्तम अहेरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.