नागपूर :- आज जागतीक महीला दिनाच्या निमित्ताने Phd 2022 संशोधक विद्यार्थी यांनी फेलोशिप साठी सीएसएमटी व बीएमसी मुंबई समोर महाराष्ट्र सरकार विरोधात निदर्शने केली.
आझाद मैदान मुंबई पोलिसांनी निदर्शकांना अटक करून त्यांची सुटका केली. यावेळी सीमा वानखेडे, प्रकाश पट्टेकर, उत्तम शेवडे, चंद्रगुप्त सावळे, रोहित तिकोटे किरण फुगारे, जुही खोब्रागडे, वर्षा जाधव, दिपाली गडहिरे, नमिता खरात आदी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
अनुसूचित जातीतील 761 विद्यार्थ्यांना जातीवादी सरकारने जाणून बुजून दोन वर्षापासून फेलोशिप पासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. पुण्यात बार्टी कार्यालयापुढे 130 दिवस व आझाद मैदान मुंबई येथे 45 दिवसापासून धरणे निदर्शने आंदोलन सुरू असून शासनाने दखल न घेतल्याने आज विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेतली.