नागपूर :- मी, नितीन प्रल्हाद पटाव, वय 46 रा.न्यू सातारा फाईल, भुसावळ, दामू कुंभार वाड्यामागे मुक्काम पोस्ट तालुका-भुसावळ,जिल्हा जळगाव वरील पत्त्यावर राहत असून नागपूरच्या संविधान चौक येथे दिनांक 16/05/2023 ला आमरण उपोषण करण्यासाठी आलो, परंतु सीताबर्डी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी “आमरण उपोषणाची” परवानगी नाकारून “साखळी उपोषण” करावे लागले. मी संविधान चौकात जवळपास 42 डिग्री तापमानाच्यावर साखळी उपोषण सुरू असून माझ्या या साखळी उपोषणाची शासन व प्रशासन यांनी कोणत्याही प्रकारची आज तागायत दखल घेतलेली नाहीच.
उपोषणाच्या मागण्या :
दि.वा.पगार वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्त धुळे या पदावर हजर झाल्यापासून वनसंपदेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करून अधिनस्त वनकर्मचारी अधिकारी यांना हाताशी धरून विविध प्रकरणात नियमबाह्य कृती व शासनाच्या नियमांचा भंग करून पदाचा दुरुपयोग करून त्यांनी कोट्यावधी रुपये कमवल्या प्रकरणी दि. 31/5/2023 पूर्वी त्यांची विभागीय चौकशी उच्च कमिटी मार्फत सुरू करून एसीबी (ACB) मार्फत चौकशी सुरू करणे तसेच त्यांची सेवा निवृत्तीचे उपदान रोखून ठेवणे बाबत शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी पुराव्यानिशी तक्रारी सादर केलेल्या आहे व त्यांनी वेळीच दखल घेऊन वाय.एल पी.राव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख म.रा.नागपूर यांच्याकडे अहवाल मागणी केलेला आहे. परंतु वाय.एल. पी.राव हे पगार व यांच्या अधिनस्त असलेले दोषी एस.व्ही पाटील, महेश पाटील, भोसले, आर.आर देवळे, कृपाली शिंदे, बिराजदार हौसिंग, डी.ओ.पाटील व संबंधित वन अधिकारी यांच्यावर कारवाई न करता त्या सर्वांची पाठ राखण करीत आहे. करिता, मी वाय.एल.पी. राव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख म.रा नागपूर यांच्या विरोधात उपोषण करीत आहे. मी स्वतः उपोषणावर बसलो त्या दिवसापासून दररोज न चुकता राज्यपाल, महाराष्ट्र राज्य राजभवन मुंबई नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व वेणू गोपाल रेड्डी प्रधान सचिव वने महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना सतत मी उपोषणाबाबत ई-मेल द्वारे कळवीत आहे. परंतु नागपूर येथील वाय.एल.पी.राव प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख म.रा. नागपूर हे स्वतः सदर प्रकरणात सहभागी असल्याने वरील सर्व दोषी असलेल्या वनाधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्या सर्वांना पाठीशी घालत आहे. वरील भ्रष्टाचार प्रकरणात मला उपोषण दरम्यान न्याय जरी मिळाला नाही तर यानंतरचे माजी आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे.