बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– मानव धर्माच्या सेवकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.  

कन्हान :- बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री महाराज हयां नी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव जी यांच्या भक्ती, कार्याबद्दल व अनुयायीयांच्या बद्दल आक्षेपार्ह टिपणी व प्रवचनाच्या माध्यमातुन अपप्रचार करित असुन मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावने ला ठेस पोहचविण्याचे कार्य करित असल्याने मानव धर्माच्या सेवकांनी दिनेश देशमुख चा नेतृत्वात कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील हयांना निवेदन देऊन तात्काळ धीरज शास्त्री यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मोहाडी येथे धिरेंद्र शास्त्री यांचा गुरुवार (दि २८) मार्च पासुन चंदु बाबा स्टेडियम ला धर्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असुन शुक्रवार (दि.२९) मार्च ला आपल्या धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातुन अनुयायीयांना मार्गदर्शन करताना मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे विचार व कर्याबद्दल विवादित टिपनी करून सर्व सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचवली आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी प्रवचनाच्या माध्यमातुन महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा उल्लेख करत ” जे राम भजत नाही त्यांचे पूर्वज तर नरकात आहेतच पण तुम्ही व येणारी पिढी नरकात जाईल ” अशा आशयाचे टिपनी करत सेवकांच्या धार्मिक भाव ना दुखविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर ” परमात्मा एक मार्गात आई वडिलांना मानत नाही तो हनुमान भक्त होवु शकत नाही, असे बोलत मानव धर्माचा अपप्रचार केला. महानत्यागी बाबा जुमदेव यांनी मान व धर्म, परमात्मा एक मार्गाच्या माध्यमातुन सदैव परि वर्तनाचा विचार दिलेला आहे व समाजाला व्यसनमुक्त व अंध श्रध्दामुक्त करण्याचे कार्य करणे सुरू आहे. मानव धर्मातील सेवक हे परिवर्तनवादी व विज्ञानवादी विचाराचे आहेत. संतानी जे विचार सांगितले आहेत ते मानव धर्मात मानले जातात. धर्म आणि भक्तीच्या नावाखाली समाजामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्यावर आक्षेपार्ह टिपनी करुन मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भाव ना दुखावुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य करित असल्याने मानव धर्माच्या सेवकांनी दिनेश देशमुख यांचे नेतृत्वात कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ धीरज शास्त्री यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.अन्यथा उग्र आंदोलनाचा ईशारा सुध्दा देण्यात आला आहे. निवेदन देताना संजय भैस, मोरेश्वर भोयर, गजानन राहाटे, अनिल केवट, अरविंद वरणकर, धीरज देवांगन, प्रमोद घुले, मंगेश भोयर, पंजाब भोयर, विजय गोंडाने, सागर फुले, रोहित सहारे, शांतानु राऊत, श्यामुजी सहारे, रोहित हावरे, अतुल मानकर, शिवनाथ खंडाटे, नितिन चनेकर, श्यामजी पुंड, अनिकेत पुंड, विनोद घुले, संजय भोयर, उद्यजी बोरकर, रमेश हावरे, सुरेश केवट, शालीकराम साखरकर, नारायण भोयर, शिवजी गोंडाणे, केपीजी भैस, अशोक ठाकरे, सुरेंद्र चौरे,स्वाती देशमुख, वनमाला ठाकरे, गीता सहारे, रमा सहारे, कविता हावरे, मनिषा घुले, मिना गोंडाणे, मनिषा राऊत, बेबी वरणकर, आशा साखरकर, रामेस्वरी कश्यप, लक्ष्मी गोंडाणे, सरिता भोयर आदी सह सेवक बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज विकास ठाकरे पिंजून काढणार दक्षिण नागपूर; इंडिया आघाडीच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

Mon Apr 1 , 2024
नागपूर :- देशात वाढती बेरोजगारी, महागाई, सत्ताधाऱ्यांकडून संवैधानिक केंद्रीय संस्थांचा गैरवापर याला सामान्य नागरिक कंटाळला आहे. सामान्यांची आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार विकास ठाकरे आज (ता. १ एप्रिल २०२४) रोजी सकाळी ८ वाजता पासून दक्षिण नागपूर पिंजून काढणार आहे. त्यांच्या सोबत इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती राहील. इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी रविवारी शहरातील विविध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!