कन्हान परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्या वर अंकुश लावण्याची मागणी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  

सात दिवसाचा आत कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू – अतुल हजारे 

भाजपा पदाधिका-यांचे पोलीस निरीक्षका मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन. 

कन्हान : – शहरात व ग्रामिण भागात दिवसे दिवस गुन्हेगारी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बिनधास्त सुरू असुन शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यानी सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करित निवेदन देत कन्हान परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची मागणी केली आहे.

कन्हान, कांद्री, टेकाडी (को.ख) परिसरात मागिल एका वर्षा पासुन गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण मोठ या प्रमाणात वाढले असुन कन्हान पोलीस प्रशासना च्या निष्काळजीने कुठलिही कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांना, व्यावसायिकांना गाव गुंडांच्या त्रासाने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. या बाबत विविध संघटने द्वारे वारंवार तक्रार करून आणि निवेदन देऊन ही गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा हे गावगुंड करत आहे. त्यात अल्पवयीन गुन्हेगार दिवस रात्र दारू- गांज्या, विविध नशा करून सामान्य नागरिकांना चाकु चा धाक दाखवणे, व्यावसायिकांकडुन अवैध वसुली करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, चाकु, कट्टे असे घातक शस्त्र घेऊन परिसरात शांती सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. गावगुंडां कडुन गेल्या काही दिवसा पासुन बेकायदेशीर गुन्हे घडवुन आल्या वर ही यांना पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाक दिसत नसुन दिवसेंदिवस गावगुंडांची हिम्मत वाढलेली आहे. त्यामुळे आता पर्यंतच्या पहिल्या घटनांच्या तपासातील गावगुंडांचा शोध घेऊन तात्काळ त्यांच्यावर न्यायाल यीन कारवाही करावी. या गावगुंडांवर वचक ठेवणे, रात्रीची पोलीस गस्त वाढविणे. असे लिखित निवेदने दिल्यावर ही पोलीस प्रशासन त्यावर कुठल्याही प्रकार ची अंबलबजावणी न केल्याने या गावगुंडांच्या रोजच्या हरकती वाढल्याने नागरिकां मध्ये पोलीस प्रशासना च्या विरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका पदाधिका-यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांचा नेतृत्वात कन्हान सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले यांची भेट घेऊन चर्चा करून त्याचे मार्फत मा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांना निवेदन देऊन परिसरातील वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यावर सात दिवसाच्या आत अंकुश लावण्या ची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, रिंकेश चवरे,अविनाश कांबळे, मोती हारोडे, कामेश्वर शर्मा, सौरभ पोटभरे, लोकेश आंबाळकर, प्रतिक्षा चवरे, मिना कळंबे, सचिन वासनिक, लीलाधर बर्वे, शैलेश शैळके, मयुर माटे,ऋषभ बावनकर,रवि महाकाळकर , अमोल साकोरे, मनोज लगे, बंटी यादव, शुभम यादव, प्रविण सिंग, चिंतामण सार्वे, चंद्रशेखर चिकटे सह भाजपा पदाधि कारी बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

क्रिडा महोत्सवातुन चांगले खेळाडु घडतात..

Thu Dec 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  धर्मराज प्राथमिक शाळेत चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन.   कन्हान : – शालेय जिवनात क्रिडा खेळाचे महत्त्व असु न यातुनच चांगले खेळाडु निर्माण होतात. धर्मराज शाळेने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यां च्या कलागुणांना वाव दिला असल्याचे प्रतिपादन उद्घाटक  धनंजय कापसीकर यांनी केले. धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.७) डिसेंबर पासुन चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रिडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!