आंबेडकर रुग्णालयाच्या कामास विलंब का? – उत्तम शेवडे बसपा 

नागपूर :- नागपूर परिसरातील व विशेषत: उत्तर नागपूरच्या सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी 2014 पासून प्रलंबित असलेल्या डॉक्टर आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे (सुपर स्पेशालिटी) बांधकाम विनाविलंब सुरू करावे अशी मागणी काल बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे व जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांच्या नेतृत्वातील बसपाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे ह्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली.

उत्तर नागपूरातील इंदोरा येथे 2005 पासून रुग्णालय व ओपीडी सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या व आर्थिक स्थिती पाहून 2014 रोजी महाराष्ट्र सरकारने या रुग्णालयाला 8 मजल्याची इमारत बांधून त्यात 615 घाटांची व्यवस्था करण्याचे निश्चित केले व त्यासाठी 1165 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केला होता. परंतु या सरकारने हे रुग्णालय व तो निधी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फुले शाहू आंबेडकरी जनतेने या सरकार विरुद्ध बंड पुकारून एक महिना आंदोलन चालविले होते. त्या आंदोलनात बसपाचा व त्यांच्या नगरसेवकांचा फार मोठा रोल होता.

या रुग्णालयात 17 विशेष व 11 सुपर स्पेशालिटीचे विभाग प्रस्तावित आहेत. प्रलंबित बांधकाम विनाविलंब सुरू करावे ह्यासाठी काल बसपा नेते उत्तम शेवडे व योगेश लांजेवार यांच्या दिशानिर्देशात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक निवेदन दिले. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य असे की हे रुग्णालय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व कॉलेज शी संबंधित असून यासाठी कामठी रोडवर सुरू असलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी 15 एकड पेक्षा जागा उपलब्ध आहे जिथे अत्याधुनिक रुग्णालय उभारल्या जाणार आहे.

शिष्टमंडळात माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, चंद्रशेखर कांबळे, उमेश मेश्राम, सुनील बारमाटे, तारा गौरखेडे, भदंत डॉ धम्मोदय, अनिल मेश्राम, राजेंद्र सुखदेवे, सावलदास गजभिये, अजय उके, शत्रुधन धनविजय आदींचा समावेश होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तुम्ही हे वाचाल तर अवाक किंवा थेट ठार वेडे व्हाल.....

Sat Jul 27 , 2024
ज्यांची वेश्या वृत्ती असते तेच असे हमखास वागतात, काही मिळो अथवा ना मिळो अगदी दारिद्रयात देखील जी संसाराचा गाडा हाकते ती पतिव्रता असते आणि एक जुनी म्हण आहे,सका पाटील मेला म्हणून लगेच तुका पाटील केला, यापद्धतीने जी वागते तिलाच वेश्या म्हणतात. जर माझी माहिती खरी असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा श्याम मानव हे देखील वेश्या प्रकारातच मोडतील म्हणजे अलीकडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com