संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रुईगंज दरगाह जवळ दोन अज्ञात व्यक्तींनी दुबई ची करंशी 100 दिनार चे नोट असलेली थैली देऊन 2 लक्ष रुपये घेतले.तिथून गेल्यावर थैली तपासले असता त्या थैलीत दिनार करंशी असलेली 100 चे नोट च्या ऐवजी वर्तमानपत्राची रद्दी दिसून आली यानुसार दोन आरोपी अज्ञात व्यक्तींनी करंशी च्या नावावर 2 लक्ष रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार 20 मे ला सकाळी 9 वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर रहिवासी फिरोज नझिर खान वय 42 वर्षे रा फरीद नगर,झिंगाबाई टाकळी, नागपूर व त्याचा मित्र राजू उर्फ सुनील चरनदास गजभिये यांना विमानतळ येथे दोन व्यक्ती भेटले असता त्यांनी त्यांच्याकडे दुबई ची करांशी 100 दिनार चे नोट विक्री करण्याचे लालच देऊन त्या बदल्यात 2 लक्ष रुपये ऍडव्हान्स देणे बाबत सांगितले असता फिर्यादी हे त्याच्या मित्रांसह 2 लक्ष रुपये घेऊन गेले असता आरोपी दोन अज्ञात व्यक्तींनी दुबईची करांशी 100 दिनार चे नोट असलेली थैली दिली आरोपी तेथून निघून थैली तपासून बघितली असता करणशी न देता थैलीत न्यूज पेपर चे रद्दी असलेले बंडल देऊन आर्थिक फसवणूक केली.याप्रकरणी फिर्यादी फिरोज नझिर खान ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन आरोपी विरुद्ध भादवी कलम 420, 34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
—