संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- मृग मोवेस अकॅडमी आणि समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले बहुउद्देशिय संस्था टेकाडीच्या सयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात उन्हाळी शिबिर राबवुन मुलाचा सुप्त गुणांना विकसित करण्यात चांगला पर्यंत करून शिबीराच्या पहिल्या टप्याचा समारोप तर दुस-या टप्याचा शुभारंभ करण्यात आला.
समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले बहु. संस्था टेकाडी व्दारे विद्यार्थ्याना विविध कलागुणाचे प्रशिक्षण देऊन स्वरक्षण व सामाजिक बांधिलकी जोपासण्यास नेहमी पर्यंतशिल असुन एक भाग म्हणुन छोटया विद्यार्थ्याचे उन्हाळी शिबिराच्या पहिल्या टप्याचा समारोप तर दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे यांचे अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी युवा सामाजिक संघटन अध्यक्ष अमित वासाडे, राजे फाउंडेशनचे अध्यक्ष केतन भिवगडे, शिवबा राजे अकॅडमीचे अभिजीत चांदुरकर आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व नट सम्राट च्या प्रतिमेस माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
उन्हाळी शिबिरात नुत्य, रांगोळी, हस्तकला, चित्रकला, वुशू कराटे, शिव कला लाठी काठी आत्यादीचे प्रशिक्षण देऊन त्यानी आत्मसात केलेल्या कलेच्या स्पर्धा घेऊन प्राविण्य विद्यार्थाना बक्षीष देऊन गौरविण्यात करण्यात आले. यात रांगोळी स्पर्धा १) कनक यादव, २) माही यादव, हस्तकला स्पर्धा १) मिष्टी यादव, २) ईशान यादव, चित्रकला स्पर्धा १) आदित्य राजभर, २) जूही राजभर, मॉडलिंग स्पर्धा १) सोम्या राजभर, २) लावण्या यादव हयाना स्वर्ण व रजत पदकाने गौरविण्यात आले. व आदेश आंबागडे, आदित्य अंबागडे, कुणाल कांबळे, अमोल कांबळे, मित नाईक, पूर्वेश नाईक, शब्द नाईक, नेहा सोनबावणे, लावण्या होले, जानवी सातपैसे, सिद्धार्थ सातपैसे, विशाल सातपैसे आदीना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र तसेच मागील स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकिता बेले हयानी तर आभार निलेश गाढवे यानी व्यकत केले. कार्यक्रमास राजेंद्र बेले, दक्षिता दीक्षित सह पालक व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.