दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 22 डिसेंबरला

नागपूर :- बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी सोबतच उद्योजकांना योग्य व कुशल मनुष्यबळ प्राप्तीसाठी दिनांक 22 डिसेंबरला सकाळी 1 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील दिक्षांत सभागृहात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील इच्छूक बेरोजगार युवकांनी मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ व्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाने केले आहे.

मेळाव्यात नागपूर विभाग व विभागाबाहेरील मोठ्या कंपन्याचा सहभाग राहणार आहे. या कंपन्यामध्ये आय. टी. आय., बँकींग, सेल्स एक्जेक्युट्युव, ग्रज्युऐट/अंडरग्रज्युऐट, बारावी पास/नापास यांच्यासाठी विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. या रोजगार मेळावासाठी 1500 रिक्त पदांसाठी कंपन्यानी सहभाग नोंदविला आहे. तसेच नागपूर विभागातील ईच्छुक युवक-युवतीनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळास भेट देऊन मेळाव्यासाठी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, नागपूर कार्यालयाच्या 0712-2565479 या दुरध्वनी क्रमांकावर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ज्योती वासुरकर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उप आयुक्त प्र. वि. देशमाने यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८६ प्रकरणांची नोंद

Thu Dec 21 , 2023
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.२०)रोजी उपद्रव शोध पथकाने ८६ प्रकरणांची नोंद करून ४९७०० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com