कामठी- मौदा तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा – माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्यातील कामठी -मौदा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच ओलावृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नूकसान झाले आहे.खरीप हंगामातील बहुतांश पिके हातून गेल्यानंतर अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचे शेतातील तूर,सोयाबीन, कापूस पिकाचे उत्पादन घटल्यांनंतर झालेले आर्थिक नुकसान रब्बीतील गहू,हरभरा ही पिके आणि भाजीपाल्याच्या उत्पादनाने भरून निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र अवकाळी पावसाबरोबर झालेल्या गारपीटीमुळे रब्बी पिकांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.व शेतकरी हवालदिल झाला आहे.

संपूर्ण मौदा तालुक्यात बेमौसम पाऊस आणि गारपीटी मुळे गहू,हरभरा,मिरची ,टमाटर ,पराठी व इतर रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे.कामठी तालुक्यात बर्फाच्या माऱ्यामुळे शेतातील पिके पाण्याखाली आले आहे.आधीच पिकांचा मोबदला पुरेशा न मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना आता या अवकाळी ओलांवृष्टीमुळे शेतकऱ्यावर मोठे संकट उदभवलेले आहे.अश्या संकटात शासनाने त्वरित शासनाची मदत जाहीर करावी व झालेल्या रब्बी फसल ची नुकसान भरपाई करावी .करिता शासनाने त्वरित पिकांचा पंचनामा करून तसेच सर्व्हे करून शेतकऱ्यांना या मार्गे नुकसानीची भरपाई करण्याची मदत जाहीर करून कामठी-मौदा तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी कांग्रेस पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

NewsToday24x7

Next Post

प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Mon Feb 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे कामठी तहसिलदारांना निवेदन कामठी :- १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्याकरिता चिकना, भामेवाडा, आसलवाडा, जाखेगाव, वडोदा, खापा इत्यादी गावांच्या शेतपिकाची प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात इतर जनप्रतिनिधिनी व प्रशासकीय अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पाहणी करत असता असे आढळून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com