शाॅक लागुन महावितरण कंत्राटी कामगार श्रावण चा मृत्यु

कन्हान :- खंडाळा येथील बस स्टाॅप जवळील विद्युत खांबाजवळ विद्युत दुरूस्तीचे काम करित असतांना महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगार श्रावण भारसाखरे यांचा मृत्यु झाल्याने संपुर्ण कन्हान परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार गुरुवार (दि.२२) जुन ला दुपारी ३.३० ते ४ वाजता दरम्यान तारसा रोड खंडाळा बस स्थानकाजवळ महावितरण कंपनीचे लाईनमॅन व काही कर्मचारी विद्युत दुरुस्तीचे काम करित होते. लाईनमॅन खांबावर चढुन दुरुस्तीचे काम करत असल्याचे बोलल्या जात आहे. मृतक श्रावण लक्ष्मण भारसाखरे वय ५० वर्ष रा. पिपरी-कन्हान हा तिथेच खाली उभा होता. एबी स्वीच उचलत असतांना श्रावण भारसाखरे हा अचानक खाली पडुन बेशुध झाल्याने सहकाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रावण ने इशा-याने छातीत दुखत असल्याचे म्हटल्याने त्याच्या छातीला हाताने दाबुन पंप करून हात-पायांची मसाज करून कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन कामठी ला रेफर केल्याने कामठी रुग्णालयात उपचारा दरम्यान श्रावण भारसाखरे यांचा मृत्यु झाला.

सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच सहा. फौजदार सुर्यभान जळते, महेंद्र जळीतकर, सम्राट वनपर्ती हयांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी अभियंता प्रल्हाद बुद्धलाल ओमकार वय ३९ वर्ष रा. हनुमान नगर कन्हान यांचा तक्रारी वरून पोस्टे ला कलम १७४ जा.फौ अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Sat Jun 24 , 2023
आंतरराज्य पूर व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या बैठकीत दिल्या सूचना नागपूर :-  संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी मध्यप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या तीन राज्यांच्या केंद्रीय जल आयोग, जलसंपदा विभाग व महसूल प्राधिकरणाच्या यंत्रणांनी आपसी समन्वयाने काम करावे व पुराच्या काळात जीवित व वित्तहानी टाळण्याला सर्वतोपरी प्राधाण्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. आंतरराज्य पूर व्यवस्थापन आणि समन्वय समितीची बैठक आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com