संदीप बलवीर,प्रतिनिधी
# लामसोंगे परिवाराने केले अवयव व देहादान
# विश्वशांती सामाजिक संस्थेचा पुढाकार
# महिन्याभरात बुटीबोरी परिसरातील तिसरे अवयव व देहादान
नागपूर :- मनुष्यप्राणी जन्माला आला म्हणजेच तो कधीतरी मरणारच. मग मरणानंतर त्याला मातीत पुरले किंवा जाळून टाकले तरी त्याचा मानवीसमाजाला काहीच फायदा नाही.त्यामुळे त्यांना मातीत पुरण्यापेक्षा किंवा जाळन्यापेक्षा त्याचे अवयव व देहादान केल्याने गरजू व्यक्तीला जर नवजीवन मिळत असेल तर तो पुढे चांगले आयुष्य जगेल म्हणून मृत्यू हे अंतिम सत्य तर देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल),नागपूर येथील देहदान समिती सदस्य प्रा.डॉ.सुशील मेश्राम यांनी बुटीबोरी येथील लोकेश हरिभाऊ लामसोंगे यांच्या मातोश्री स्मृतिशेष कासूबाई हरिभाऊ लामसोंगे यांच्या निर्वान संस्काराचे प्रसंगी केले.
बुटीबोरी वॉर्ड क्र ५ येथील रहिवासी लोकेश लामसोंगे यांच्या मातोश्री कासूबाई (७५) यांचे रविवार दि १५ ऑक्टो ला वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यामुळे त्यांनी लगेच शेजारी राहणारे डॉ भीमराव मस्के यांना आईच्या निधनाची माहिती दिली.डॉ मस्के यांनी लामसोंगे यांना अवयव व देहादानाचे महत्व सांगताच त्यांनी देहादान व अवयवदाणाला होकार देताच त्यांनी विश्वशांती सामाजिक न्याय संस्था चे सचिव चंद्राबाबू ठाकरे यांच्याशी संपर्क करून संबंधित सर्व माहिती दिली.चंद्राबाबूनी एका क्षणाची उसंत न घेता नागपूर मेडिकल येथील देहादान समिती सदस्य प्रा डॉ सुशील मेश्राम यांच्याशी संपर्क केला.लगेच महात्मे नेत्रालय,नागपूर येथून डॉक्टरांची चमू बुटीबोरी येथे आली व घरीच डोळ्याचे कारनिया च्या ऑपरेशन करून ते आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर दत्ता मेघे हॉस्पिटल,ची चमू येऊन त्यांनी येथील डॉक्टरांना प्रात्यक्षिक व शिक्षणाकारिता मृतदेह स्वीकारित सोबत घेऊन गेले.
महत्वाची बाब अशी कि, विश्वशांती सामाजिक न्याय संस्था, चंद्राबाबू ठाकरे, डॉ भीमराव मस्के यांच्या पुढाकाराणे टाकळघाट बुटीबोरी परिसरात महिन्याभरात हे तिसरे अवयव व देहादान झाले असून हे फार कौतुकास्पद व अभिनंदनीय बाब आहे. तथागत गौतम बुद्धानी सांगितलेल्या दान पारमितेला ते जीवनभर आपल्या कृतीतून करून दाखवीत असल्याचे विशेष.यापूर्वी टाकळघाट येथील पुरोगामी विचार मंच चे मार्गदर्शक, समाजसेवी शरद बलवीर यांनी आपल्या मातोश्री यांचे अवयव व देहादान तर ७ ऑक्टो ला रुई खैरी येथील पत्रकार संजय जीवणे यांनी आपल्या वडिलांचे अवयव व देहादान केले असून दि १५ ऑक्टो ला लोकेश लामसोंगे यांनी आपल्या आईचे अवयव व देहदान करून सर्व मानवसमाजा समोर आदर्श दान पारमितेचे उदाहरण प्रस्तुत केले.