इंदर खदान चा ५१ टन कोळसा चोरून विकणा-या आरोपीला अटक

संदीप कांबळे, कामठी

वेकोलिचा २,५७००० रू.चा कोळसा चोरणा-या आरोपीस ट्रक सह अटक, सुरक्षा अधिकारी ची कारवाई.

कामठी ता प्र 16 : – वेकोलि इंदर खुली कोळसा खदान येथुन एकाच ट्रकने दोन ट्रक कोळशा म्हणजे ५१ टन ४५० किलो किंमत २ लाख ५७ हजार रूपयाचा कोळसा चोरून विकणा-या ट्रक चालक परसुराम गौतम यास ट्रक सह वेकोलि सुरक्षा अधिका-यांनी पकडुन कन्हान पोलीसांना तोंडी तक्रार दिल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत इंदर खुली कोळसा खदान चा कोळसा डुमरी रेल्वे कोळसा यार्ड ला वाहतु क करून पोहचविण्याचा कंत्राट बी एल ए कंपनी चा असुन त्यांच्या कडील कोळसा वाहतुक करणा-या ट्रक क्र एम एच ३४ ए बी २३९९ च्या चालकांनी इंदर खुली कोळसा खदान येथुन पहिले २६ टन कोळसा भरून रेल्वे यार्ड मध्ये कोळसा न पोहचविता दुसरी कडे नयाकुंड येथील कोळसा टालवर नेऊन विकला. तसेच परत दुस-यादां इंदर खुली खदान मधुन २५ टन ४५० किलो कोळशा ट्रक मध्ये भरून डुमरी रेल्वे यार्ड येथे कोळसा खाली न करता सामोर बालाजी पेट्रोल पंप समोर कांद्री कडे जाताना वेकोलि सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांना मिळुन आल्याने ट्रक चालकांस विचार पुस केली असता एक ट्रक कोळसा नयाकुंड टालवर विकला आणि हा सुध्दा विकायला जात असल्याचे सांगितल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी हयानी कन्हान पोलीस स्टेशन ला बोलावुन आरोपी ट्रक चालक परसुराम माखन गौतम वय २९ वर्ष राह. शिवनगर झोपडपट्टी कांद्री यास ट्रक मध्ये भरलेला २५ टन ४५० किलो कोळसा सह ताब्यात दिले. कन्हान पोलीस स्टे ला वेकोलि सुरक्षा रक्षक रवी कंडे यांनी वेकोलि चा ५१ टन ४५० किलो कोळसा किमत २ लाख ५७ हजार रूपयाच्या कोळसा चोरणा-या ट्रक चालका विरूध्द तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी आरोपी परसुराम माखन गौतम विरूध्द अप क्र १८३/२२ कलम ४०७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पो सहा निरिक्षक महादेव सुरजुसे पुढील तपास करित आहे.

Next Post

नालंदा बुद्ध विहार, संजीवन नगर कांद्री येथे डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण

Sat Apr 16 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 16: – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्य जयंती च्या पर्वावर नालंदा बुद्ध विहार, संजीवन नगर गहुहिवरा रोड कांद्री येथे डॉ बाबासाहेब आंबेड कर यांच्या प्रतिमेचे अनावरण करून बाबासाहेबाची जयंती थाटात साजरी करण्यात आली. गुरूवार (दि.१४) एप्रिल २०२२ ला सायंकाळी ५ वाजता नालंदा बुद्ध विहार संजीवन नगर, गहुहिवरा रोड कांद्री-कन्हान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com