संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– डीसीपी पाचच्या पथकाने दिले 29 गोवंश जनावरांना जीवनदान
कामठी :- गोवंश हत्या बंदी कायदा लागू असूनही अवैध वाहतुकी द्वारे मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची कुणकुण डीसीपी पाच च्या पथकाला लागताच डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ कार्यरत असलेले एपीआय जितेंद्र ठाकूर व पथकाने या गोवंश तस्कर बाजाच्या मुसक्या आवळन्याचे ठरविले असून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने आज पहाटे साडे पाच दरम्यान कमसरी बाजार जवळ तीन वाहनाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन वाहनावर यशस्वीरीत्या धाड घालण्यात यश गाठले.या धाडीतून तिन्ही वाहन ताब्यात घेत त्यातील 29 गोवंश जनावरांची सुटका करीत नजीकच्या पारडी गोरक्षण शाळेत सुरक्षित ठेवून कत्तलखान्यात जाणाऱ्या गोवंश जनावरांना जीवनदान देण्याची मौलिक भूमिका पोलिसांनी साकारली. तसेच संधी साधून एका वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढण्यात यश गाठले असले तरी दोन आरोपी अटकेत आहेत तर कायद्यानुसार दोन अटक व एक पसार अश्या तीन आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करीत जप्त 29 गोवंश जनावरे तसेच तीन वाहन असा एकूण 16 लक्ष 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपीमध्ये अब्दुल शाहिद अब्दुल रफिक वय 24 वर्ष राहणार मोमीनपुरा नागपूर, जाहीर खान वय 34 वर्ष राहणार कामगार नगर कामठी तसेच पसार आरोपीचे नाव फैझान राहणार भाजी मंडी कामठी असे आहे.या धाडीत घटनास्थळाहून वाहन क्रमांक MH-30-BD-3996 किंमत अंदाजे 4 लक्ष रुपये,MH-28-BB-4998 किंमत अंदाजे 4 लक्ष रुपये, MH-40-BL-9182 किंमत अंदाजे 4 लक्ष रुपये, तसेच 29 गोवंशीय जनावरे किंमत अंदाजे 4 लक्ष 25 हजार रुपये अशाप्रकारे एकूण 16लक्ष 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय जितेंद्र ठाकूर,अंकुश गजभिये,योगेश ताथोड,रवी शाहू,अरुण चांदणे,श्रीकांत विष्णुरकर आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.