पंजा कुस्तीमध्ये दारासिंग हांडा ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’- खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील पंजा कुस्ती स्पर्धेमध्ये दारासिंग हांडा ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ ठरला. विशेष म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवात मागील वर्षी चॅम्पियन ठरलेल्या दारासिंग ला यंदाही आपले जेतेपद कायम ठेवण्यात यश मिळाले आहे.

सक्करदरा तलाव परिसरामध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुषांच्या 100 किलो वजनगटात दारा सिंग हांडा याने प्रतिस्पर्धकाला मात देत यशावर मोहोर उमटविली. या वजनगटात अनिरुद्ध पाटील याने दुसरे आणि शशिकांत सोनुले ने तिसरे स्थान प्राप्त केले. 100 किलोवरील वजनगटात गतवर्षी उपविजेता राहिलेल्या आयुष शर्मा ने बाजी मारली व पहिले स्थान पटकाविले. गतवर्षीच्या विजेत्या आर्यन गंगोत्री ला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अक्षद मुरकुटे तिसऱ्या स्थानावर राहिला.

महिलांच्या 60 किलो वजनगटामध्ये हिमांशी तायवाडे चॅम्पियन ठरली. या गटात लतिका इरले व निधी भिसे यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 60 किलोवरील वजनगटामध्ये विधी खंडेलवाने पहिले स्थान पटकाविले. प्राची बनोते ने दुसरा आणि निशा तरारे ने तिसरा क्रमांक पटकाविला.

निकाल (पहिला, दुसरा व तिसरा)

पुरूष

50 किलो : दिशांत नाईक, शुभ वासनिक, क्रिश डहरवाल

60 किलो : विशाल दुतोंडे, हसन वल्लाह, सुभाष यादव

70 किलो : ऋषिकेश गंगोत्री, मोहित होले, अंश जगनीत

80 किलो : अथर्व भागवत, मिहिर गौर, यश दुधे

90 किलो : साकिब शेख, सुमित पात्रा, शिवम दिवेदी

100 किलो : दारा सिंह हांडा, अनिरुद्ध पाटील, शशिकांत सोनुले

+100 किलो : आयुष शर्मा, आर्यन गंगोत्री, अक्षद मुरकुटे

महिल

60 किलो : हिमांशी तावडे, लतिका इरले, निधी भिसे

+60 किलो : विधी खंडेलवाल, प्राची बनोटे, निशा तरारे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची मदत तात्काळ वाटप करा ! 

Thu Jan 16 , 2025
– संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा !  मोर्शी :-अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरूड चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा यासह विविध तालुक्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. त्यामुळेच पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!