रब्बी हंगामातील ५ पिकांसाठी ‘पीक स्पर्धा’, ३१ डिसेंबर अंतिम मुदत

नागपूर :- नवनवीन प्रयोगाद्वारे कृषी उत्पादनामध्ये भर घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन परिसरातील शेतकऱ्यांना होण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम-2024 मध्ये विविध 5 पिकांसाठी राज्यांतर्गंत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस पिकांसाठी नागपूर विभागातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटामध्ये 31 डिसेंबर 2024 पर्यंत शेतकऱ्यांना ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी पीक स्पर्धेमध्ये अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी प्रती पीक प्रवेश शुल्क 300 रुपये तर आदिवासी गटासाठी प्रती पीक 150 रुपये प्रवेश शुल्क राहणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी

या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे, व स्वत: जमीन कसत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धकास स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील.

ही कागदपत्रे आवश्यक

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत प्रवेशपत्र भरल्याचे चलन, 7/12, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बॅक खाते, चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत जोडणे अनिवार्य आहे.

असे असणार बक्षिसाचे स्वरुप

स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 5,000/- रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी 3,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 2,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे. जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 10,000/- रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी 7,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 5,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शेतकऱ्याला 50,000/- रुपये तर व्दितीय क्रमांकासाठी 40,000/- रुपये व तृतीय क्रमांकासाठी 30,000/- रुपये असे बक्षिसाचे स्वरुप असणार आहे.

या स्पर्धेच्या संदर्भातील अधिक माहिती राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या www.krishi. maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानभवन परिसरात 50 वे सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शन

Fri Dec 6 , 2024
नागपूर :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्यान शाखेमार्फत 25 व 26 जानेवारी 2025 रोजी विधानभवन परिसरात 50 व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पुष्प प्रदर्शनात गुलाब व हंगामी फुले, कॅक्‌टस, सक्कुले, शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या, पुष्परचना प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनात पुष्प्‍ स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी सहायक संचालक उपवने व उद्याने, बांधकाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com