अर्थसहाय्य योजनेचा लाभासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी

गडचिरोली :- राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.

सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण 6793 खातेदार पैकी 3563 खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. मात्र या व्यतिरिक्त राहिलेले 3230 खातेदार यांनी त्यांचे आधार संमती आवश्यक आहे. या पैकी 2826 खातेदार यांनी दिनांक 03.10.2024 अखेर ekyc पूर्ण केले आहे उर्वरीत शिल्लक 3967 खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर पुढीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ज्या शेतक-यांचे ई-केवायसी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतक-यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात. तरी, आपल्या गावाच्या कृषि सहाय्यक यांना आपले आधार संमती व E-Kyc चे काम पुर्ण करण्यास सहाय्य करावे. व सदर काम तात्काळ पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 'आमची व्होट बँक व्हा !' 

Fri Oct 4 , 2024
         मुसलमानांनी अविलंब राजकीय शरणागती पत्करावी .. असा वातावरणीय फतवा दिसतो. एक फास संपला की दुसरा येतोय. सारखे सातत्य आहे. संपणे संपत नाही. आता ताजे ‘वक्फ बोर्ड’ आलेय ! दम घ्यायला उसंत नाही. बिनाबोलाने आमची सुरक्षित मतपेढी व्हा असेच सांगणे दिसते. आता वक्फ कायदा सुधारणा विधेयक आले. या वक्फ चर्चेने सर्वसामान्य मुस्लिमांच्या घरचे काही जात नसले तरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!