कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ०.५ कि मी अंतरा वर असलेल्या वैष्णवी ऑप्टीकल समोरील रोडवर एका अज्ञात आरोपीने महिलेला कोरोनाचे पैसे मिळ वुन देण्याचे म्हणुन सोन्याचे दागिने घेऊन फसवणुक केल्याने कन्हान पोस्टे ला महिलेच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.७) एप्रिल २०२२ चे दुपारी ११ ते २ वाजता दरम्यान मंजुळा वामनराव ढेंगे वय ६५ वर्ष राह. राधाकृष्ण नगर कन्हान हया रस्त्याने पायदळ जात असतांना कोणी तरी अज्ञात महिलेने हाक मारून ” तुम्ही अमोल डांगे च्या आई आहात का ? कुठे जात आहात ? असे विचारून, मी तुम्हाला कोरोना चे पैसे मिळवुन देते. त्याकरिता तुम्हाला सरकारी दवाखाना कामठी येथे यावे लागेल. असे म्हणुन रस्त्याने जाणारा रिक्षा थांब वुन त्या ऑटो रिक्षा मध्ये बसुन सरकारी दवाखाना कामठी ला उतरले व सरकारी दवाखान्यात गेले. तेथे गेल्यावर महिलेने कोरोनाचे पैसे काढुन देण्यासाठी साहेबांना ५,००० रूपये द्यावे लागतात. पैसे नसतील तर सोन्याचे दागिने दिले तरी चालतील असे बोलली असता मंजुळाबाई ने तिच्या गळ्यातील जुने वापरते सोन्याचे दागिने किंमत १६,२५० रूपयाचा मुद्देमाल त्या महिलेस दिला. ते घेवुन महिला साहेबांची सही घेऊन येतो असे सांगुन निघुन गेली. आणि ती महिला परत आली नाही. भरपुर वेळ झाल्यावर मंजुळा बाई ला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने पो स्टे कन्हान गाठुन फिर्यादी मंजुळा डेंगे यांनी तोंडी तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात महिला आरोपी विरुद्ध ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात सहायक फौजदार गणेश पाल हे करीत असुन आरोपी महिलेचा शोध घेत आहे.