नागपूर :- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे व खते उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. अडचणी व तक्रारी संदर्भात सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना संपर्क साधता येईल.
खरीप हंगाम 2024-25 करिता बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण करण्यामध्ये कृषी विभागाच्या सूचनेनुसार विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. कृषी विभागाचा दूरध्वनी क्रमांक 0712-2559910 तसेच टोल फ्रि क्रमांक 18002334000 व भ्रमणध्वनी क्रमांक 9373821174 या क्रमांकावर व्हॅाट्स ॲप द्वारे संपर्क करता येईल. कृषी विभागाच्या मेल वर सुध्दा आपली तक्रार नोंदविता येईल अशी माहिती नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक एस. एम. तोटावार यांनी दिली.
नियंत्रण कक्षामध्ये तक्रार नोंदवितांना स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारी संदर्भात सक्षिप्त तपशिल दिल्यास तक्रारींचे जलद गतीने निवारण करणे शक्य होईल.