नागपूर :- नागपूर जिल्हा परिषदेत संविधान दिनानिमित्त नवीन प्रशासकीय इमारती समोरील प्रांगणात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता विष्णू कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविका वाचन करण्याचा उपक्रम नागपूर जिल्हा परिषदेमधूनच करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित सर्वांना व्यसन मुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता विष्णू कोकड्डे रश्मी, जिल्हा परिषद सदस्य ममता धोपटे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक ईलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जलजीवन मिशन) संजय वानखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, गट विकास अधिकारी डॉ. स्वप्नील मेश्राम व जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन उच्चश्रेणी लघुलेखक डॉ. सोहन चवरे यांनी केले.