कोदामेंढी :- येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील येथूनच आठ वर्षांपूर्वी हकालपट्टी झालेले विज्ञान शिक्षक नागमोते हे पुन्हा येथे रुजू झालेले असून शिक्षक नागमोते यांच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या प्रकार “भारत देश हे आशिया खंडात नव्हे युरोप खंडात आहे” असा असून विषय समजून न सांगता प्राध्यापकासारखे वाचून सांगतात. धडा पूर्ण होण्याआधीच नवीन धड्यांना सुरुवात करत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेले विषय समजत नसल्याचे व एक लाख वीस हजार पगार घेणारे शिक्षक नागमोते यांनी त्यांचे इतर विषय शिकवण्यासाठी पेटी कॉन्ट्रॅक्टर शिक्षक रामटेके यांना ठेवल्याचे व शिक्षक रामटेके यांचे अध्यापन कार्यही विद्यार्थ्यांना समजत नसल्याचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपिका मोती कौशिक यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले.
तर शिक्षक नागमोते हे दारूच्या नशेत शाळेत येतात, दारूच्या नशेतच विद्यार्थ्यांना चुकीचे शिकवतात , विद्यार्थ्यांनी लिहिलेले चुकीचे उत्तरही बरोबर असल्याचे सांगतात व दिवसभर दारूच्या नशेत असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण मारत असतात असे विद्यार्थी त्यांच्या पालकांना सांगत असून पालकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सदर वार्ताहर ला सांगितले.
आठ वर्षांपूर्वी या नशेडी शिक्षक नागमोते च्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्यानंतर त्यांची बदली पंचायत समिती काटोल येथे करण्यात आली होती. परंतु दोन वर्षांपूर्वीपासून त्यांना येथे पुन्हा पाठविण्यात आले असून त्यांच्या वर्तनात व अध्यापनाच्या कार्यात सुधारणा होत नसून त्यांनी त्यांचे विषय शिकविण्यासाठी शासनाकडून एक लाख वीस हजार पगार घेत असतानाही नियमबाह्य पद्धतीने एका पेटी कॉन्ट्रॅक्टर शिक्षक रामटेके पाच हजार रुपये देऊन ठेवला असून त्यांचेही अध्यापन कार्य विद्यार्थ्यांना समजत नसल्याने त्यांना व त्यांच्यासारख्या अशा नशेडी , पेटी कॉन्ट्रॅक्टर शिक्षक ठेवणारया जिल्हा परिषद च्या सर्व शिक्षकांना निलंबित करण्याऐवजी सरळ तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या ऐवजी व्यसनमुक्त चांगल्या शिकवणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती करून जिल्हा परिषद शाळेतील खालावलेला शिक्षणाचा दर्जा उंच करावा अशी मागणी येथील व येथे शिकणाऱ्या परिसरातील आठ गावातील पालकवर्ग, सामाजिक कार्यकर्त्यां सह ढसाढसा रडणाऱ्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ने केली आहे.