भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, बाल कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, सामाजिक न्याय यासह 18 महत्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाशासित राज्यांतील उत्तम तरतुदीही समाविष्ट केल्या जातील. जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहण्यासाठी विभागनिहाय समित्या नेमण्यात येतील. अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे सारे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिनेही व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण शक्तिनिशी काम करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्नात वाढ झाली. गेल्या 54 वर्षांत जे झाले नाही ते आमच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत झाले. भाजपाचा जाहीरनामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसून कायमस्वरुपी त्यात वाढ होत राहील. नागरीकांना संवादातून समाधान आणि प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिग्गज उम्मीदवारों के खिलाफ डमी उतारा जाएगा,सरकार किसी की भी बने

Fri Oct 18 , 2024
– विधानसभा चुनाव : कांग्रेस-भाजपा के मध्य मौखिक समझौता,बड़ा गेम करेंगे प्रवीण दटके,बड़ी पार्टी रहेगी भाजपा  नागपुर :- लोकसभा चुनाव में भाजपा को मनमाफिक सफलता नहीं मिली। भाजपा के राष्ट्रीय नेतामंडली की मन इच्छा थी कि कम से कम नितिन गडकरी चुनाव हार जाए लेकिन हुआ नहीं,जबकि दूसरा उम्मीदवार चंद्रशेखर बावनकुले ने गडकरी की जगह चुनाव लड़ने की इच्छा जताई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!